चंदगड गटविकास अधिकारी पदी सुभाष सावंत रूजू - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2023

चंदगड गटविकास अधिकारी पदी सुभाष सावंत रूजू

 

सुभाष सावंत

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          चंदगड येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी सुभाष लक्ष्मण सावंत हे काल रूजू झाले. विद्यमान गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांची फलटण येथे बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. 

      सुभाष सावंत यांचे मुळगाव राशिवडे खुर्द (ता. राधानगरी) असून १९९८ साली त्यानी निवड मंडळाच्या माध्यमातून विस्तार अधिकारी पदाची परिक्षा उत्तीर्ण झाले. जत, शिराळा, वाळवा (जि.सांगली) येथे विस्तार अधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर पन्हाळा पंचायत समितीकडे सहाय्यक व अतिरिक्त गटविकास अधिकारी म्हणूनही सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवा कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता व हागणदारी मुक्त तालुका असे पुरस्कार ही पन्हाळा तालुक्याला मिळाले आहेत. चंदगड पंचायत समितीच्या कर्मचारी वर्गामार्फत नुतन गटविकास अधिकारी श्री. सावंत यांचे स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment