उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोवाड शिवसेना शाखेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2023

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोवाड शिवसेना शाखेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

केंद्र शाळा कोवाड येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या व खाऊ वाटप प्रसंगी शिवसेनेचे (ठाकरे) पदाधिकारी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे सर्व १७५ विद्यार्थ्यांना वह्या व जिलेबी खाऊ वाटप करण्यात आले. चंदगड तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना शाखा कोवाड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदगड विधानसभा सहसंपर्कप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे हे होते.

   स्वागत केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील यांनी केले. प्रास्ताविक युवासेना उपजिल्हा समन्वयक प्रतिक क्षीरसागर यांनी केले. यावेळी बोलताना सुनील शिंत्रे यांनी ``शिवसेना तालुकाप्रमुख मनवाडकर तसेच कोवाड व परिसरातील सर्व शाखांचे पदाधिकारी व शिवसैनिक तालुक्यातील नागरिकांचे विविध सामाजिक प्रश्न व संकट समयी प्रशासनाच्या आधी मदतीला धावतात असे गौरवोद्गार काढले. अशा निष्ठावंत शिवसैनिकांमुळे पक्ष तळागाळापर्यंत रुजला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री असताना कोरोना सारख्या अनेक संकटांत एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे सर्वांचे खंबीरपणे संरक्षण व संगोपन केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड शिवसेनेच्या वतीने राबविण्यात आलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले.``

        यावेळी चंदगड तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर, जिल्हा उपसंघटक संभाजी पाटील ( आजरा), गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीपराव माने, आजरा तालुकाप्रमुख युवराज पवार, कोवाड शाखाप्रमुख संतोष भोगण यांनी आपल्या भाषणातून उद्धवजींना शुभेच्छा दिल्या. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख विक्रम मुतकेकर, शिवसहकार सेना उपजिल्हाप्रमुख अशोकराव खोत, शिवसेना शहरप्रमुख शिवानंद अंगडी, शिवसेना विभाग प्रमुख रणजीत भातकांडे, उपतालुकाप्रमुख रवींद्र पाटील, विनोद पाटील व यल्लाप्पा मुतकेकर, दुंडगे शाखाप्रमुख मारुती पाटील, नागरदळे शाखाप्रमुख परशराम मुरकुटे, युवासेना उपतालुकाप्रमुख अवधूत भुजबळ, शिवसेना सुरुते शाखाप्रमुख बाबू चौगुले, बांधकामसेना अध्यक्ष उमाजी पवार, बांधकामसेना उपतालुकाप्रमुख विलास बिर्जे, विभाग प्रमुख दिगंबर पाटील, अनिरुद्ध कुट्रे, रामा मनवाडकर, जानबा कांबळे, समीर मुल्ला, विष्णू बुरुड, सुधीर पाटील, बाबू पाटील, केंद्रप्रमुख बी. एस. शिरगे, अध्यापक श्रीकांत आप्पाजी पाटील, गणपती लोहार, मधुमती गावस, भावना अतवाडकर, जयमाला पाटील आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment