ताम्रपर्णी क्रिकेट क्लबने राजगोळी बु. येथे केले वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2023

ताम्रपर्णी क्रिकेट क्लबने राजगोळी बु. येथे केले वृक्षारोपण

राजगोळी बु. येथील छ शिवाजी महाराज स्टेडीअम परिसरात वृक्षा रोपन करताना ताम्रपर्णी क्रिकेट कलबचे पांडूरंग पाटील व सहकारी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
       आज  छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम  राजगोळी  बुद्रूक (ता. चंदगड) च्या प्रांगणामध्ये 100 वृक्षांचे वृक्षारोपण  ताम्रपर्णी क्रिकेट कलबच्या वतीने करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या परीने  प्रयत्न केला तरचं भविष्यात आपण शुध्द हवा घेऊ. म्हणून एक दिवस पर्यावरणासाठी हे ब्रीद  घेऊन प्रत्येकाने एक झाड लाऊया, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लाऊया असे आवाहन  पांडुरंग पाटील  यांनी करून सर्वाना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून दिले. 
     या वृक्षारोपण सोहळ्यात  ताम्रपर्णी क्रिकेट क्लबचे मेंबर संदिप पाटील, दिनकर पाटील, कल्लाप्पा बाणेकर, प्रविण सुतार, विलास भिरोडकर, हणमंत कोकीतकर, राहूल वर्पे, प्रकाश पाटील व सर्व  सहकारी सहभागी झाले होते. तसेच  छ.शिवाजी महाराज स्टेडियम राजगोळीचे सर्व  पदाधिकारी यांच्या  मोलाच्या सहकार्यातून हा वृक्षारोपण सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.


No comments:

Post a Comment