जागृती प्रशालेत रंगला चिखल महोत्सव! विद्यार्थ्यांनी लुटला विविध खेळांचा मनमुराद आनंद - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2023

जागृती प्रशालेत रंगला चिखल महोत्सव! विद्यार्थ्यांनी लुटला विविध खेळांचा मनमुराद आनंद

जागृती प्रशालेत रंगला चिखल महोत्सव! विद्यार्थ्यांनी लुटला विविध खेळांचा मनमुराद आनंद

गडहिंग्लज / सी एल वृत्तसेवा - एस. के. पाटील

       शहरातील जागृती हायस्कूलमध्ये अनोखा चिखल  महोत्सव जल्लोषी वातावरणामध्ये पार पडला. शाळेच्या मैदानावर चिखल तयार करण्यात आलेला होता. विद्यार्थ्यानी भर पावसात संगीताच्या तालावर विविध खेळाचा मनमुराद आनंद लुटला.

       महोत्सवाचे उदघाटन मुख्याध्यापक विजय कुमार चौगुले यांच्या हस्ते रोपास पाणी घालून झाले. पर्यवेक्षक  शिवजी अनावरे, अनिल मसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या प्रांगणात पार पडलेला महोत्सवात सुमारे दिडशेहून अधिक विद्यार्थी सह‌भागी साले होते.

        यावेळी विद्यार्थ्यांनी डोंगर पेटला पळा पळा, लंगडी कोंबडा , झुक झुक झुक झुक आगीनगाडी, राणा घोडा, आंधळी कोशिंबीर, साखळी साखळी, जिम्मा फुगडी, रस्सीखेच या मनोरंजक खेळासह लंगडी, कबड्डी, खो -खो, कुस्ती, हाँडी बॉल, फुटबॉल, डॉजमॉल इत्यादी सांघीक खेळांचा मनमुराद खिलात खेळून आनंद लुटला. झिंग झिंग झिंगाट या सिनेम्याच्या गाण्यावर ठेका धरून चिखल महोत्सवाचा मनसोक्त आनंद विद्यार्थ्यांनी लूटला.

      चिखल महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्रिडा शिक्षक संपत सावंत  प्रकाश हारकारे, अजित मसाळे , प्रविण पाटील , प्रकाश गायकवाड, दसरथ परोटे, सागर मगदूम, विपूल गावीत, रविंद्र भंडारे, भरत पाटील, आनंदा खोत, सौ. गिता पाटील सौ. कल्पना पाटील, सौ. ए. एस. पाटील, सौ. ए. बी. कुंभार कोमल पाटील, सौ. शितल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वागत प्रकाश हारकारे तर प्रास्ताविक संपत सावंत यांनी मानले.

No comments:

Post a Comment