माजी जि. प. सदस्य हळदणकर यांच्याकडून होतकरू विद्यार्थीनींना लेखन साहित्याचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2023

माजी जि. प. सदस्य हळदणकर यांच्याकडून होतकरू विद्यार्थीनींना लेखन साहित्याचे वाटप

 

कन्या शाळेत  होतकरू विद्यार्थीनींना लेखन साहित्याचे वाटप करताना माजी जि. प. सदस बाबुराव हळदणकर व इतर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

   चंदगड येथील कन्या प्राथमिक शाळेत माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव रामा हळदणकर यांच्या हस्ते होतगरु विद्यार्थ्यींनींना लेख साहित्य, वह्या व पेन वाटप करण्यात आले. 

       या प्रसंगी ह.भ.प. गुंडू बाबू गुळामकर, ह भ प विठ्ठल रामा जुवेकर, ह भ प मारुती भिकू देसाई, ह भ प प्रकाश वामन पंत, ह भ प कृष्णा चंदगडकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती कन्या चंदगडचे अध्यक्ष कमलाकर सावंत, उपाध्यक्ष सावंत भोसले, संतोष हळदणकर, अनिल जावडेकर, सौ. कांबळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment