महसूल विभागामार्फत चंदगड तालुक्यात १ ते ७ ऑगस्ट २०२३ दरम्यान महसूल दिन सप्ताह साजरा करण्यात येणार - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2023

महसूल विभागामार्फत चंदगड तालुक्यात १ ते ७ ऑगस्ट २०२३ दरम्यान महसूल दिन सप्ताह साजरा करण्यात येणार


चंदगड / प्रतिनिधी

        महसुल विभागाच्या वतीने मंगळवार १ ऑगस्ट ते सोमवार दि ७ ऑगस्ट २०२३ पर्यत `महसूल सप्ताह` साजरा करणेत येणार आहे. चंदगड तालुक्यामधील नागरिकांनी सदर योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार राजेश चव्हाण यांनी केले आहे.

         मंगळवार दि १ ऑगस्ट २०२३ महसूल दिन, महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार असून विविध महसुल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या  अधिकारी, कर्मचारी यांचा यावेळी गौरव करणेत येणार आहे. बुधवार दि. २ ऑगस्ट रोजी युवासवांद या कार्यक्रमाअंतर्गत शाळा / महाविद्यालय स्तरावरती मोहिम राबविणेत येणार आहे. महसुल विभागामार्फत इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी नंतर महसुल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्राच्या अनुषंगाने माहिती देण्यात येणार आहे. तसेच विविध दाखले वाटप करण्यात येणार आहेत. गुरुवार दि. ३ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा नैसर्गिक आपत्ती अंतर्गत माहे एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकरी यांना लाभ देणेत येणार आहे. शुक्रवार दि. ४ ऑगस्ट रोजी  जनसंवाद साधणार आहे.

        महसुल विभागामार्फत महसूल अदालत आयोजन केले असुन प्रलंबित प्रकरणे निकाली काढणेत येणार आहेत. जमिनी विषयक नोंदी अद्यावतीकरण प्रलंबित अर्ज निकाली ठेवणे व आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी याचे निराकरण करणेत येणार आहे. शनिवार दि.५ ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमातंर्गत सैनिकांना महसूल विभागामार्फत देण्यात येणारे प्रमाणपत्र शहीदाच्या वारसाना जमिन वाटपाबाबत प्रकरणे निकाली ठेवण्यात येतील. रविवार दि. ६ ऑगस्ट रोजी महसूल विभागातील कर्मचारी याचेशी सवांद साधणार आहे. महसुल कर्मचारी यांचे सेवा विषयक बाबींची पुर्तता करण्यात येणार आहे. तर सोमवार दि.७ ऑगस्ट रोजी नागरिकांच्या उपस्थितीत महसुल सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment