हलकर्णी महाविद्यालयात प्रा. गोनुगडे व वरिष्ठ लिपिक मोरे यांचा सेवापूर्ती सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2023

हलकर्णी महाविद्यालयात प्रा. गोनुगडे व वरिष्ठ लिपिक मोरे यांचा सेवापूर्ती सत्कार

प्रा. के. एम. गोनुगडे यांचा सपत्नीक सत्कार करताना गोपाळराव पाटील व आदि मान्यवर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        मानवी जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे सकारात्मकता होय. जीवन सुंदर आहे ते अधिक समृद्ध अनुभव देते. अशावेळी माणसाने आपल्या आयुष्यातल्या कर्तव्याचा प्रत्येक दिवस सार्थकी लावणे म्हणजे समाधान होय.' असे प्रतिपादन गोपाळराव पाटील यांनी केले. दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी (ता. चंदगड) येथे आयोजित केलेल्या प्रा. के. एम. गोनुगडे आणि वरिष्ठ लिपिक गोकुळ मोरे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

वरिष्ठ लिपिक गोकुळ मोरे यांचा सपत्नीक सत्कार करताना अशोकराव जाधव गोपाळराव पाटील आदी मान्यवर

      प्रारंभी प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी केले. मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रा. गोनुगडे आणि श्री. मोरे  यांचा शाल श्रीफळ, मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन यांचा सपत्नीक सत्कार गोपाळराव पाटील, अशोकराव जाधव, डॉ. जे. जे. व्हटकर, प्रा. जे.एम. उत्तुरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  कर्मचारी सी. ए.पाटील, प्रा. एच. के. गावडे, डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी मनोगते व्यक्त केली. अशोकराव जाधव  यांनीही शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती प्रा. गोनुगडे, श्री. मोरे यांनीही महाविद्यालयाबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
     यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष पाटील, सचिव विशाल पाटील, व्यवस्थापक मनोहर होसुरकर, संचालक उत्तम पाटील संचालक जगन्नाथ इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. गोनुगडे आणि श्री. मोरे यांनी महाविद्यालयाला भेटवस्तू दिल्या. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सत्कार मूर्तींचे कुटुंबिय, हितचिंतक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार पाटील यांनी केले तर आभार प्रा. एस. एन.खरुजकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment