वैताकवाडी येथे गोवा बनावटीची लाखाची दारू जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2023

वैताकवाडी येथे गोवा बनावटीची लाखाची दारू जप्त

  


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         वैताकवाडी (ता. चंदगड) येथे गोवा बनावटीची आईस फाईन व्हिस्की कंपनीची १ लाख १२ हजार ३२० रूपयाची दारू जप्त केली. या प्रकरणी अल्लाबक्ष राजेसाब मुल्ला (वय- ५१ वर्षे, रा. तुर्केवाडी, ता. चंदगड) याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वैताकवाडी येथे सुरेश पवार यांच्या शेतात गट नं ८० मध्थे आडोशाला अल्लाबक्ष मुल्ला याने गोवा बनावटीच्या दारूचा बेकायदेशीर साठा करून त्याची बेकायदेशीर विक्री करत असताना चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतले. मुल्ला यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई ९०, १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment