चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील १४ गावातील कोतवाल भरतीसाठी आरक्षण सोडत सोडत आज गुरुवार दि. १० रोजी चंदगड येथील तहसील कार्यालयातील सभागृहात प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. यावेळी राजेश चव्हाण, नायब तहसीलदार हेमंत कामत, निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील उपस्थित होते.
आरक्षण काढण्यात आलेले सजे व त्या सजात पडलेले आरक्षण पुढील प्रमाणे :- १) शिरोली (अनुसूचित जमाती), २) सातवणे - इतर मागास प्रवर्ग (माजी सैनिक), ३) तांबुळवाडी - विशेष मागास प्रवर्ग, ४) हलकर्णी - भटक्या जमाती ब, ५) मौजे शिरगांव - भटक्या जमाती ड, ६) कोवाड -- अनुसूचित जमाती (महिला), ७) ढेकोळी - भटक्या जमाती क, ८) तुर्केवाडी -सर्वसाधारण (खेळाडू), ९) सुंडी - सर्वसाधारण (माजी सैनिक), १०) चिंचणे सर्वसाधारण (माजी सैनिक) ११) कोकरे अनुसूचित जाती (महिला) या सजातील रिक्त कोतवाल पदे भरणेत येणार आहेत. तर शासनाच्या एकूण पदांपैकी ८०% पदे भरण्याच्या आद्यादेशानुसार चंदगड तालुक्यातील रिक्त १४ सजापैकी ११सजातील आरक्षण सोडत पुर्ण करण्यात आली आहे. कानूर बू, कागणी व पाटणे या सजातील कोतवाल आरक्षण पुढील वेळेस काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली. या आरक्षण सोडतीवेळी संबंधित सजातील नागरीकांनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment