चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कांतिकारकांना अभिवादन व भितीपत्रकाचे उदघाटन असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. ९ ऑगस्ट १९४२ या दिवशी चले जाव या कांतिकारी चळवळीला सुरूवात झाली म्हणूनच हा दिवस कांतीदिन म्हणून साजरा केला जातो. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथून कांतिपर्व सुरू झाले. ऐतिहासिक शहर मुंबई येथे गोबालिया टँक मैदानावर म्हणजेच आजच्या आझाद मैदानावर ८ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय कांग्रेसचे अधिवेशन भरले. याच दिवशी ऐतिहासिक भुमित एक ऐतिहासिक ठराव झाला.
या ठराबात स्वातंत्र्याविषयी ठाम भूमिका घेतली गेली महात्मा गांधीजीनी गर्वशक्तीनिशी इंग्रजांविरोधी संघर्ष करण्याचे आव्हान केले. महात्मा गांधीजीनी करेंगे या मरेंगे हा संदेश भारतीय जनतेला दिला. याच दिवशी महात्मा गांधीजींनी इंग्रजांना चले जाव चा इशारा दिला. इंग्रजांनी भारतातुन चालते व्हावे असे निक्षून सांगितले. सर्व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. या सर्वांच्या अथक परिश्रमातुन भारतीय स्वातंत्र्याची पहाट १५ ऑगस्ट १९४७ रोजी उगवली. अशा थोर कांतिकारकांच्या कार्याचे महत्व भावी पिढीला समाजावे म्हणून महाविद्यालयामध्ये भितीपत्रकाचे उदघाटन संस्थेचे सचिव विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यातून कांतिकारकांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी पिंतावरी चिरमुरकर व आरती पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. ए. एम. जाधव, प्रारंभी संस्थेचे सचिव विशाल पाटील यांच्या हस्ते कांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत प्रा मधुकर जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा.व्ही . व्ही . कोलकार , डॉ . एन . बी हिरगोंड , डॉ . राजेश घोरपडे, प्रा. ए. एस. बागवान, डॉ. सी. बी. पोतदार, डॉ. ए. पी. गवळी, प्रा. एस. डी. तावदा , पा. एच. के. गावडे, प्रा. आर. बी. गावडे, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. के. एम. गोनुगडे, प्रा. ए. बी. पिटूक, प्रा. ए. व्ही. नौकुडकर, प्रा. एन . एम . कुचेकर , प्रा . एस . पी . गावडे , प्रा . मी . एम तेली , प्रा . एन . के . जावीर , आर . एम . पवार , ए . ए . मकानदार, एस .जी . गिरी सौ. एम.के.पाटील, एन डी बोकडे,एम.आय पाटील, ए . पी.चव्हाण. आदिसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी , विद्यार्थीनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इतिहास विभाग प्रमुख डॉ. जे. जे. व्हटकर यांनी केले तर आभार आरती पाटील यानी मानले.
No comments:
Post a Comment