कालकुंद्री (ता. चंदगड) येथील कवी संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य एस. एल. बेळगावकर सोबत कवी व प्राध्यापक वर्ग.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
श्रावण मासाचे औचित्य साधून कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम पवार ज्युनिअर कॉलेजमध्ये ज्युनिअर विभागाच्या वतीने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य एस. एल. बेळगावकर होते. निमंत्रित कवी म्हणून एन. जे. बाचुळकर, वाय. के. पाटील, इराप्पा पाटील आदींची उपस्थिती होती.
प्रा. विनायक कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या. यामध्ये विनायक पाटील, एकनाथ मनवाडकर, सुमित कांबळे, प्रीती वडर, आदिती कुट्रे व सानिका पाटील यांचा समावेश होता. कवी संमेलनामध्ये प्रा. रवी पाटील, प्रा. संग्राम पाटील, प्रा. अनिल गुरव यांनी सहभाग घेतला. इराप्पा पाटील यांनी आपल्या प्रेम कविता व वास्तव कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. वाय. के. पाटील यांनी 'मी गाढव' कवितेतून प्राणी आणि माणसातला फरक अधोरेखित केला. याप्रसंगी प्रा. दयानंद तेऊरवाडकर, प्रा. बामणे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. विनायक कांबळे यांनी केले. प्रा. अनिल गुरव यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment