कष्टाशिवाय यश मिळत नाही - संग्राम कुपेकर, हेरे येथील सह्याद्री विद्यालयात स्पोर्टस किटचे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2023

कष्टाशिवाय यश मिळत नाही - संग्राम कुपेकर, हेरे येथील सह्याद्री विद्यालयात स्पोर्टस किटचे वितरण

 

हेरे येथील सह्याद्री विद्यालयात स्पोर्टस किटचे वितरण कार्यक्रमात बोलतानाजि. प. चे माजी बांधकाम  समिती सभापती संग्राम कुपेकर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       यश ही नशीबाने मिळणारी गोष्ट नाही, यश मिळविण्यासाठी आपली कामगिरी इतरांपेक्षा सरस व्हायला हवी. यशस्वी होण्यासाठी गुणवत्तेची कास धरा असे प्रतिपादन जि. प. चे माजी बांधकाम  समिती सभापती संग्राम कुपेकर यांनी केले. ते हेरे (ता. चंदगड) येथील सहयाद्री विद्यालय व ज्युनि. कॉलेज हेरे येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय समिती चेअरमन के. एस. माळवे होते. प्रारंभी प्रास्ताविक प्राचार्य यु. एल. पवार यांनी केले. 

     अध्यक्षीय भाषणात के. एस. माळवे यांनी अपयश हा यशाचा महामार्ग आहे. तुम्हांला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या प्रयत्नांचा वेग दुप्पट करा केले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते, नवागत विद्यार्थी स्वागत, १०वी व १२वी परीक्षेत  गुणानुक्रमे आलेल्या विदयार्थ्याचा सत्कार पुष्प व ग्रंथ देऊन करण्यात आले. यावेळी श्री. माळवे यांनी खेळाडूसाठी दिलेल्या स्पोर्ट्स किटचे वितरण, गरीब व होतकरू विदयार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप  करण्यात आले. 

    यावेळी सचिव प्रा. आर. पी. पाटील, प्रा. एन. एस. पाटील, ॲड. संतोष मळवीकर आदीनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी  ज. गा. पाटील, एम. एम. तुपारे, शालेय समिती सदस्य य. बा. देसाई, प्रभाकर पाटील, आप्पाजी गावडे, भगवंत पाटील, माजी प्राचार्य एस. जी. सातवणेकर, शामराव मुरकुटे, उपसरपंच विशाल बल्लाळ, रामाणा पाटील, शरद गावडे, भागोजी गावडे यांच्यासह सर्व अध्यापक, सेवक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एफ. ए. मुल्ला यांनी केले तर आभार टी. बी. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment