हलकर्णी महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2023

हलकर्णी महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

 

हलकर्णी महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत 

चंदगड / प्रतिनिधी

         ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे,उत्तम गुणवत्ता असलेले शिक्षण मिळावे हा दृष्टिकोन ठेऊन दौलत विश्वस्त संस्था वाटचाल करीत आहे. पुस्तकी ज्ञाना बरोबरच व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांनी घ्यावे. मन एकाग्र करून अभ्यास करा ,कठोर परिश्रम घ्या व स्वतःच्या पायावर उभे रहा, कॉलेज व येथील शिक्षक देत असलेले ज्ञान शिस्त आणि संस्काराची शिदोरी घेवुन त्याचा उपयोग आपले भविष्य घडवण्यासाठी करा.असे प्रतिपादन दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी केले.ते हलकर्णी ता.चंदगड येथील गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अकरावी कला, वाणिज्य व विज्ञान वर्गात प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक संतोष घोळवे हे उपस्थित होते. 

      प्रारंभी प्राचार्य डॉ.बी. डी अजळकर यांनी प्रास्ताविक करून ज्ञान व कौशल्या बरोबर संस्कार देण्याचे काम  महाविद्यालय करत असते. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास निर्माण व्हावा व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले

            यावेळी पो. निरीक्षक. संतोष घोळवे म्हणाले, विद्यार्थ्यांनो तुमची घरची परिस्थिती यशाच्या आडवी येवू शकत नाही कोणतेही कारण न सांगता आपर मेहनत घ्या.जिद्द चिकाटी ठेवून अभ्यास करा यश नक्की मिळते. मोबाईल ,सोशल मीडियाचा वापर कमी करा.आपली कुवत ओळखून करिअरची निवड करावी ,आपल्या चौकस बुद्धीला विकसित करून स्वतःचा मार्ग स्वतः शोधा.चांगल्या मित्रांची संगत ठेवा.

या कार्यक्रमांत पोलिस उपनिरिक्षक पदी निवड झाल्याबद्दल तांबुळवाडी गावची कन्या कु.प्रतीक्षा पाटील हीचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्रतीक्षा पाटील हिने ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश संपादन करू शकतात त्यासाठी कष्ट व अभ्यासातील सातत्य महत्वाचे आहे. तसेच आपण अभ्यास करताना केलेला वेळेच्या नियोजनाचा ७/१२आराखडा विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.

       प्रा.आर.बी.गावडे यांनी पाहुण्यांची ओळख करून  संस्थेचे अधक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील व सचिव विशाल पाटील ,संचालक उत्तम पाटील,शिवाजी तुपारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एन. एम.कुचेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला प्रा.एच. के.गावडे, प्रा सी. एम.तेली,एन.एम मोरे,. प्रा एन. के.जावीर, प्रा एस.पी.घोरपडे, प्रा अंकुश नौकुडकर , प्रा जे. के.पाटील, प्रा शाहू गावडे , प्रा संजीव चिंचणगी, प्रा रोहित मोरे,प्रा एस.डी.पाटील,प्रा जे. एम उत्तुरे , प्रा एस.एस.सुभेदार, प्रा एस. वाय.अरबळी मॅडम,

तपरशुराम नाईक,अभिजित चव्हाण,युवराज रोड यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. प्रा.आर.बी.गावडे यांनी पाहुण्यांच परिचय करून दिला.आभार प्रा.एस.बी कांबळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.एन.पी.पाटील व प्रा.गीतांजली पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment