चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
पाणी हे जीवन असून अनेक आजारांच मूळ असल्याचे ओळखून मजरे कारवे गावाला शुध्द पाणी मिळावे या हेतूने विरबॅक कंपनीच्या सहकार्याने मिळालेल्या वाॅटर एटीएमचे उद्घाटन शुक्रवारी पार्वती मेडिकलचे संचालक देवगौंडा पोवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजी तुपारे होते.
सुरवातीला माजी उपसरपंच निवृत्ती हारकारे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विरबॅक कंपनीचे एरिया बिझनेस मॅनेजर रायबा साळवे, सचिन चव्हाण, संकेश आग्रे तसेच वाॅटर एटीएमसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल पोवार यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी पोवार यांच्या हस्ते फीत कापून वाॅटर एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. सरपंच तुपारे म्हणाले की, ``विरबॅक कंपनीच्या सीएसआर फंडातून पोवार यांनी हे मशीन मिळवून दिल्याने समाधान व्यक्त केले.`` यावेळी उपसरपंच पांडुरंग बेनके, सदस्य दिलीप परीट, सदस्या बेबीताई बोकडे स्मिता बेनके प्रियांका हारकारे, ग्रामसेवक सुरेखा गिरीबुवा, देवाप्पा बोकडे, एम. एम. तुपारे, तानाजी गडकरी, रमेश परीट, जयवंत हारकारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment