कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने रविवार दिनांक 3 सप्टेंबर पासून जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या निर्देशानुसार राज्यभरात 3 सप्टेंबर पासून ही जनसंवाद पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी 3 सप्टेबर रोजी चंदगड येथून येथे सकाळी 7 वाजता या पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. लोक भावना जाणून घेणे हा यात्रेचा मुख्य हेतू आहे. यात्रे दरम्यान महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्द्यांबाबत लोकांशी संवाद साधला जाणार आहे. तरी या यात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
ही यात्रा प्रत्येक तालुक्यात काढण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी यात्रेचा सकाळचा टप्पा आणि दुपारचा टप्पा असे दोन टप्पे असतील. दोन्ही टप्प्याच्या शेवटी जाहीर सभा होतील. तसेच दोन टप्प्याच्या मधल्या वेळेत कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधला जाणार आहे. त्या-त्या तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. असे या यात्रेचे स्वरूप असेल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हि यात्रा जाणार असून यामध्ये जिल्ह्यातील मान्यवर नेते, जिल्ह्यातील आजी- माजी आमदार, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, महिला आघाडी, जिल्हा युवक काँग्रेस, विविध सेलचे पदाधिकारी यांचा समावेश असेल.
कशी असेल जनसंवाद पदयात्रा
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात.
पदयात्रेचा प्रारंभ रविवार दिनांक दिनांक 3 सप्टेंबर सकाळी 7.30 वाजता तांबूळवाडी तालुका चंदगड येथून सुरवात
यात्रा मार्ग खालील प्रमाणे
तांबुळवाडी - बागीलगे- रामपूर माणगाव- शिवणगे - म्हाळेवाडी - घुलेवाडी - निटूर - दुपारी २.३० वाजता कोवाड येथे भेटीगाठी व चर्चेने समारोप.
हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment