![]() |
रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा स्वीकारताना केंद्रातील महिला शिक्षिका. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) केंद्रांतर्गत दुसरी शिक्षण परिषद मराठी विद्या मंदिर किणी येथे संपन्न झाली. केंद्रप्रमुख बी एस शिरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण परिषदेत स्वागत आप्पाराव पाटील (मुख्याध्यापक किणी) यांनी केले. केंद्र समन्वयक विलास पाटील व केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
![]() |
गुरुवंदना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीकांत सुबराव पाटील यांच्या अभिनंदन करताना केंद्रातील मुख्याध्यापक. |
'रक्षाबंधन' दिवशी झालेल्या या शिक्षण परिषद प्रसंगी केंद्रातील महिला शिक्षिकांना भेटवस्तू व पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तर केंद्रातील जक्कनहट्टी शाळेचे अध्यापक श्रीकांत सुबराव पाटील यांना गोवा हिंदी अकादमी गोवा व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा 'गुरुवंदना जीवनगौरव पुरस्कार २०२३' जाहीर झाल्याबद्दल केंद्राच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी संजय दावणे (मुख्याध्यापक कामेवाडी) संतान लोबो (मुख्याध्यापक तेऊरवाडी) एस के पाटील (मुख्याध्यापक मलतवाडी) यांच्यासह केंद्रातील कविता पाटील, सुवर्णा आंबेवाडकर, प्रकाश नांदुडकर, नारायण कोकितकर, विजय पाटील आदी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते. सुजाता म्हेत्रे- पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment