चंदगड आगाराच्या नेसरी ते बेळगाव एस. टी. साठी विद्यार्थी व ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2023

चंदगड आगाराच्या नेसरी ते बेळगाव एस. टी. साठी विद्यार्थी व ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       गेली अनेक वर्षे नित्य नियमाने चालू असणारी नेसरी बेळगाव ही चंदगड डेपो ची एसटी बस बंद केल्याने हडलगे, तेऊरवाडी, कमलवाडी  येथील विद्यार्थ्यांची ५ किमी पायपिट चालू आहे. ही बस त्वरीत चालू करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा वरील गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांनी दिला आहे.


           या बसचे वेळापत्रक

       वेळ  ११:३० चंदगड ते बेळगाव, बेळगाव ते कोल्हापूर , कोल्हापूर ते नेसरी मुक्काम. सकाळी ६:३० वा.नेसरी ते बेळगाव तेथून चंदगड ते सडेगुडवळे परत चंदगड असं बेळापत्रक होते. 

      नेसरी मुक्कामी असणारी  चंदगड डेपोची नेसरी - बेळगाव ही बस सकाळी 6.30 ला नेसरीहुन निघून तारेवाडी हडलगे तेऊरवाडी कोवाड  होसूर मार्गे बेळगावला जात होती. सकाळी  बेळगाव मार्गावर ही बस धावत असल्याने नेसरी परिसरातील प्रवाशांची मोठी पसंती या बसला होती. तसेच हडलगे तेऊरवाडी येथील कॉलेज विद्यार्थी याच बसने कोवाड येथील उच्च माध्यमिक व महाविद्यालयला जात. तसेच बेळगाव ला बाजार तसेच हॉस्पिटलला जाणाऱ्या प्रवाशांची कोवाड येथून या बसमुळे खूप चांगली सोय होत होती . पण ही बस बंद असल्याने नंतर आजऱ्या वरून येणाऱ्या 8 वाजता च्या बसची वाट बघावी लागते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या बसचा काहीच उपयोग होत नाही. चार ते पाच किमी अंतर चालत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. बस बंदमुळे विद्यार्थी व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चंदगड एस. टी. डेपो ने त्वरीत ही बस चालू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तेऊरवाडी व हडलगे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment