चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
औद्योगिक वसाहत शिनोळी (ता. चंदगड) येथील सांगाती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमार्फत सभासदांचा व सभासदांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. सन २०२२-२०२३ सालातील इयत्ता चौथी, सातवी व दहावीच्या परिक्षेत ९० % पेक्षा जादा गुण तसेच बारावी, पदवी व पदव्युत्तर परिक्षेत ७५ % पेक्षा जादा गुण, मिळविलेल्या विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती, त्याचप्रमाणे सन २०२२-२३ सालातील तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय अथवा आंतरराज्य पातळीवरील कला, क्रिडा, स्पर्धा परिक्षा अथवा अन्य क्षेत्रातील विशेष यशाची प्रमाणपत्रे प्रमाणित करुण संस्थेच्या मुख्य कार्यालय शिनोळी येथे किंवा शाखा हलकर्णी फाटा, कोवाड, तुडये, चंदगड कार्यालयात दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पाठवावीत असे आवाहन संस्थेतर्फे अध्यक्ष हिरामणी कृष्णा तुपारे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment