कुदनूर येथील रस्त्याची झालेली दुरावस्था |
कुदनूर / सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील गावाअंतर्गत व मुख्य रस्त्याची समस्या गंभीर असुन दरवर्षी या रस्यावर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते. या संमस्येकडे ग्रामपंचायतीने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
गावाअंतर्गत तऴे गल्ली, आंबेडकरनगर येथील रस्त्याची चाऴण झाली आहे. तऴे गल्ली व मुल्ला गल्ली येथील काँर्नर रस्ता, गटर अद्याप प्रलंबित आहेत. दरवर्षी या रस्त्यावर पाणी साचुन दुचाकीचे अपघात घडत आहेत. या रस्त्यावरील पाणी तऴ्यात जावुन ते पाणी दुषीत हाेत आहे. या तऴयाचा वापर जनावारांना पाणी पिण्यासाठी केला जाताेय. यामुऴे जनावारांच्या आराेग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परीणामी रस्ता, गटर हाेणे गरजेचे आहे. तर मुख्य रस्ता दुंडगे तळगुऴी काँर्नर पावसामुळे पाणी साचते. याकडे लाेकप्रतिधी तथा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे.
No comments:
Post a Comment