शिवसेनेच्या तुर्केवाडी व तुडिये विभाग प्रमुखपदी गोविंद चौगुले व अनिल गावडे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2023

शिवसेनेच्या तुर्केवाडी व तुडिये विभाग प्रमुखपदी गोविंद चौगुले व अनिल गावडे यांची निवड

 

गोविंद चौगुले व अनिल गावडे यांना विभाग प्रमुख पदी नियुक्तीची पत्रे प्रदान करताना तालुकाप्रमुख कल्लाप्पा निवगिरे सोबत शिवसैनिक.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चंदगड तालुक्यातील काही पदाधिकारी निवडी नुकत्याच घोषित करण्यात आल्या. यात तुर्केवाडी जिल्हा परिषद मतदार संघाच्या विभाग प्रमुखपदी गोविंद निंगाप्पा चौगले (तुर्केवाडी) यांची  तर तुडिये जिल्हा परिषद मतदार संघाच्या विभाग प्रमुख पदी अनिल नारायण गावडे (रा. करजंगाव) यांची निवड करण्यात आली.

     महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तडशीनहाळ फाटा येथील पक्ष कार्यालयात शिवसेना तालुकाप्रमुख कल्लाप्पा निवगीरे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी तालुका प्रमुख निवगीरे म्हणाले गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना संपूर्ण चंदगड विधानसभा मतदासंघात राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विचार घरोघरी पोहचवणे व पक्ष बांधणीसाठी जोमाने काम करणे ही आमची जबाबदारी असून त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी काम करत आहेत. नवीन पदाधिकाऱ्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य पुढे न्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी युवा सेना तालुका प्रमुख तुकाराम पाटील, संभाजी पाटील, नागेश नौकूडकर व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी चौगले व गावडे यांनी पक्ष बांधणीसाठी जोमाने काम करू असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment