अमेरिकेतील शिकागो शहरात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा : छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहन - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2023

अमेरिकेतील शिकागो शहरात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा : छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहन

 


कोल्हापूर / सी. एल. वृत्तसेवा

        'फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशन' या अमेरिकास्थित भारतीयांच्या शिखर संस्थेच्या वतीने अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित केलेल्या ७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यास छत्रपती संभाजीराजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. 

      या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त शिकागो शहरात भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेतील अनेक भारतीय बांधव या सोहळ्यास उपस्थित होते. 

        जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपली भारतीय संस्कृती जपण्यासाठी ही संस्था अथक परिश्रम घेत असते. 

       यावेळी भारताचे अमेरिकेतील कौन्सुल जनरल सोमनाथ घोष, अमेरिकेचे ज्येष्ठ खासदार डॅनी डेविस, खासदार राज कृष्ण मूर्ती, फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशन च्या अध्यक्षा डॉ. रश्मी पटेल, संचालक थॉमस अब्राहम, केविन अँटनी आणि मान्यवर मंडळी या भव्य सोहळ्यास उपस्थित होते.

No comments:

Post a Comment