हेरे सरंजामप्रश्नी हेरे सजात शुक्रवारी १० ते ५ या वेळेत शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2023

हेरे सरंजामप्रश्नी हेरे सजात शुक्रवारी १० ते ५ या वेळेत शिबीराचे आयोजन

 


चंंदगड / सी. एल. वृत्तसेवा

   महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण व्ही.के.पाटील साहेब यांच्या मार्गदर्शन नुसार व जिल्ह्याधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशान्वये हेरे सरंजामच्या शेतकऱ्यांसाठी हेरे येथे शुक्रवार दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रवळनाथ मंदिर मध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी दिली. 

        शिबिरावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार राजेश चव्हाण, नायब तहसीलदार हेमंत कामत, मंडळ अधिकारी अरुण शेट्टी यांच्यासह तलाठी तेजस्विनी पाटील महसूल कर्मचारी हजर रहाणार आहेत.

      यावेळी शेतकऱ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारून पुढील कार्यवाही करणार आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले ७ १२ विहित नमुन्यातील अर्ज घेऊन  हेरे सजातील हेरे व मोटणवाडी या गावातील लोकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

     यावेळी स्वामी प्रतिष्ठान, भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, कालुकाध्यक्ष नामदेव पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, हेरेच्या सरपंच जयश्री आप्पाजी गावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, महसूल कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment