शिनोळी येथील राजर्षी शाहू विद्यालयाल 'संत सोपानकाका सुंदर माझी शाळा पुरस्काराने' सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2023

शिनोळी येथील राजर्षी शाहू विद्यालयाल 'संत सोपानकाका सुंदर माझी शाळा पुरस्काराने' सन्मानित

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        ज्ञानदिप शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. (ता. चंदगड) या शाळेला संत सोपानकाका सहकारी बॅक सासवड पूणे यांचा ''संत सोपानकाका सुंदर माझी शाळा'' पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ समन्वय यांनी विद्याभवन येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासो लाड होते.

      'संत सोपानकाका सुंदर माझी शाळा' पुरस्कार  शिक्षक नेते दादासो लाड यांच्या हस्ते मुख्याध्यापक एन. टी. भाटे संस्थेचे सचिव बी. डी. तुडयेकर, रवी पाटील व सदाशिव पाटील यांच्याकडे सुर्पूद करण्यात आला. रा. शाहू विद्यालयाला तालुकास्तरीय  सुंदर माझी शाळा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यामुळे शिनोळीच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव सुर्यवंशी, सचिव बी. डी. तुडयेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. टी. भाटे, सहाय्यक शिक्षक रवी पाटील, सुभाष कदम, सदाशिव पाटील व शिक्षकेत्तर कर्मचारी तानाजी पाटील, पिराजी सुतार, ज्ञानेश्वर सुतार, अरुण सुर्यवंशी व यल्लुप्पा भाटे व शालेय व्यवस्थापन समितीचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

       यावेळी  प्रास्ताविक दत्ता पाटील यांनी केले.   बी. जी. बोराडे व खंडेराव जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. लक्ष्मण डेळेकर, सुरेश संकपाळ, रघुनाथ मांडरे, सचिन शिंदे  यासह जिल्हातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment