नांदवडे (ता. चंदगड) येथील ग्रामसभेला उपस्थित सरपंच, उपसरपंच, सदस्य, अधिकारी व ग्रामस्थ. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
ग्रुप ग्रामपंचायत नांदवडे-शेवाळे यांच्या वतीने स्वातंत्रदिनानिमित्त आयोजित केलेल्या ग्रामसभेत आज विविध विषयावर चर्चा झाली. ध्वनी प्रदूषण पासून लहान व वयोवृद्ध आजारी लोकांना त्रास होते. यापासून मुक्ती मिळविण्यासाठी डॉल्बीमुक्त गाव या विषयावर चर्चा झाली. यामध्ये अनेकांनी डॉल्बीमुळे कशा पध्दतीने सर्वांनाच त्रास होतो. याबाबत सविस्तर विवेचन केल्यानंतर सर्वानुमते डॉल्बीमुक्त गाव ठराव पास करण्यात आला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र कांबळे होते.
ग्रामसेविका सौ. कुंभार यांनी सन २३-२४ चा १५ वा वीत आयोग आराखडा वाचन केले. कृषी विभगाच्या वतीने कृषी सहाय्यक श्री. जाधव यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. जल जीवन मिशन च्या उर्वरित कामासंदर्भात चर्चा करुन १५ वा वित्त आयोग कामाचा आराखडा वाचन करण्यात आले. जंगली जनावराकडून होणाऱ्या नुकसानी बाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. यावेळी जर्मन नेट हा पर्याय कायमस्वरूपीचा होऊ शकतो. असे वनविभागाच्या वतीने सुचविण्यात आला. मोबाईल व टीव्हीमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांनी संध्याकाळी ०७ ते रात्री ०९ वाजेपर्यंत मोबाईल डाटा व टीव्ही बंद ठेवण्याचा ठराव पास करण्यात आला. उपसरपंच एन. एस. पाटील यांनी मुलांमध्ये मोबाइल चे होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले.
यावेळी संगीता शिवाजी गावडे, संजीवनी सुरेश सुतार, अश्विनी अशोक गावडे, विद्यानंद पुंडलिक सुतार, परशुराम म्हातारु फडके, तंटामुक्त अध्यक्ष भिवाजी पवार, उपाध्यक्ष दयानंद गावडे, पोलीस पाटील विष्णू सुतार, संपत पेडणेकर यांच्यासह कृषी विभाग, वनपाल, पाणीपुरवठा विभाग, तलाठी, आरोग्य विभाग असे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment