चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. आपला समाज रूढी परंपरा पाळणारा आहे. यामध्ये श्रावण व्रतवैकल्याचा असल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. कुठलीही गोष्ट लोकांच्यात रूजवायची असल्यास त्याला सणांची जोड दिल्यास त्याला महत्व येते. हीच बाब लक्षात घेऊन दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये श्रावण महिण्यातील पहिल्या सोमवारपासून मोबाईल चा उपवास हा उपक्रम सुरू करण्यात आला .
यावेळी प्राचार्य एन. डी. देवळे म्हणाले की, 'सद्य परिस्थितीत कोरोनानंतरच्या काळात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मोबाईल व दूरदर्शनच्या आहारी जात आहेत. त्यांचा वेळ या साधनांच्या वापरामध्ये गरजेपेक्षा जास्त खर्च होत आहे. तसेच यामुळे व्यायाम नसल्यामुळे विविध शारीरिक व मानसिक आजारांना ते बळी पडत आहेत.'
"मोबाईल पासून मुलांना दूर ठेवायचे असेल तर पालकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मागील महिण्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.एकनाथ आंबोकर यांनी पालकांसाठी नियमावली पाठवली आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी मोबाईचा योग्य वापर केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. " असे मत उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी मांडले.
हा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी टी. एस. चांदेकर, टी. टी. बेरडे, बी. आर. चिगरे, जे. जी. पाटील, शरद हदगल, डी. जी. पाटील, पुष्पा सुतार आदि शिक्षकांचे सहकार्य मिळाले.
No comments:
Post a Comment