देवरवाडी येथील वैजनाथ मंदिराची श्रावणानिमित्त स्वच्छता - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2023

देवरवाडी येथील वैजनाथ मंदिराची श्रावणानिमित्त स्वच्छता

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       श्रावण महिन्याचे औचित्य साधून देवरवाडी (ता. चंदगड) येथील वैजनाथ मंदिराची स्वच्छता भारत विकास ग्रुप यांच्या वतीने अरविंद यादव, अजित सुतार व परशराम दुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच करण्यात करण्यात आली. 

      देवरवाडी येथील वैजनाथ मंदिर हे पुरातन व प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच भारत विकास ग्रुपकडून उच्च दाबाचे पाण्याचे मशिन वापरून मंदिर आतून व बाहेरून स्वच्छ केले. तसेच मंदिर आवारातीलही कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. यामुळे मंदिर देवस्थान कमिटीकडून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी जोतिबा सुळेभावकर, रुपेश मऱ्यापगोळ, सतीश नाईक, राम धामणेकर, विनायक गुरव, सातेरी कांबळे, साहिल कांबळे, रतन काकतकर, जयवंत पाटील, अनिल सुळेभावकर, संजय पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी हि स्वच्छता केली. 

No comments:

Post a Comment