तुर्केवाडी येथील महादेवराव बीएड कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. आर. बी. पाटील
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
कोणतेही काम प्रामाणिकपणे केले की जीवनात यशस्वी होता येते. त्यासाठी जिद्द, प्रामाणिकपणा, सचोटी या गोष्टींचा जीवनात अंमल करावयास हवा असे विचार प्रा. आर. बी. पाटील यांनी व्यक्त केले. महादेवराव वांद्रे बी एड कॉलेज तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात प्रा पाटील प्रमूख पाहूणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन. जे. कांबळे होते. विभाग प्रमूख ग. गो. प्रधान प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
प्रा. पाटील पुढे बोलताना म्हणाले, ``जीवनात चूका होतच राहतात, पण त्या चुका सुधारून पुढे जात राहील पाहिजे. आपला अभ्यास श्रद्धेने करा त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी. काम थोडं पण नेटनेटकेपणा करा. कारणे देणारा मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे कारणे देऊ नका. प्रत्येक संकटावर मात करून यशस्वी व्हा, अभ्यास करून मोठं होण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एन. जे. कांबळे यांनी केले. आभार मयुरी कांडर यांनी मानले.
No comments:
Post a Comment