मांडेदुर्ग शाळेने सीमेवर तैनात जवानांसाठी पाठवल्या १५१ राख्या - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2023

मांडेदुर्ग शाळेने सीमेवर तैनात जवानांसाठी पाठवल्या १५१ राख्या

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          केंद्रशाळा कुमार विद्यामंदिर मांडेंदुर्ग (ता. चंदगड) शाळेतील विद्यार्थिनींनी 'एक राखी सैनिकांसाठी.. सीमेवरील भावांसाठी' उपक्रमांतर्गत देशरक्षणार्थ सीमेवर तैनात जवानांसाठी रक्षाबंधन निमित्त १५१ राख्या पाठवून दिल्या.

      बहीण भावाचे नाते अधिकच घट्ट बनवणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणात राखीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशसेवेसाठी आपल्या घरापासून हजारो किलोमीटर दूर सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना आपल्या बहिणीकडून राख्या बांधून घेणे शक्य होत नाही. डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करणाऱ्या या भावांचा उत्साह द्विगुणित करून बहिणीच्या  मायेचा ओलावा मिळावा या हेतूने मांडेदुर्ग शाळेतील मुलींनी आपल्या  चिमुकल्या हातांनी स्वनिर्मित १५१ राख्या दिल्ली येथील सैनिक कॅम्पमार्फत या राख्या नुकत्याच पाठवून दिल्या.

        अध्यापिका कविता पाटील यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली मुलींनी या आकर्षक राख्या बनवल्या. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक एम. डी. नाईक, अध्यापिका सुभद्रा पाटील, सुधा पाटील, राम कांबळे, विश्वनाथ पाटील, अनिल शिवणगेकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment