भारताचा चंद्रस्पर्ष ... चांद्रयान ३ चे च्या लँडिग प्रसारणाचा श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूरच्या विद्यार्थ्यांनी घेतला लाभ - चंदगड लाईव्ह न्युज

23 August 2023

भारताचा चंद्रस्पर्ष ... चांद्रयान ३ चे च्या लँडिग प्रसारणाचा श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूरच्या विद्यार्थ्यांनी घेतला लाभ



तेऊरवाडी / एस. . पाटील
      संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली अन भारतात एकच जल्लोष करण्यात आला. अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या चांद्रयान लँडिग मोहिमचे थेट प्रसारण शाळेतील मोठ्या पडद्यावर पाहण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांनी हा सुवर्ण क्षण आपल्या डोळ्यांनी टिपला.


 भारताच्या दृष्टीने नव्हे तर संपूर्ण जगाला अभिमानाची आणि गौरवाची बातमी. इस्रोच्या चांद्रयान -3 चं चंद्रावर यशस्वी लँडिग झालं. भारतातील १४० कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली. ऊर  आनंदाने भरून आला आणि प्रत्येकाने इस्त्रोच्या शास्त्रज्ञाना कडक सॅल्यूट केला. अन सर्व विद्यार्थी म्हणाले गर्व आहे. मला मी भारतीय असल्याचा! 
     कारण भारताच्या चांद्रयानाने सर्व अडचणी वर मात करत आज भेट चंद्राला च अलिंगन दिले. भारताच चांद्रयान चंद्राच्या कुशित स्थिरावले.
हा सर्व थेट अनुभव श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर चे विद्यार्थी अटल लॅबच्या मोठ्या पडद्यावर अनुभवत होतो प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांनी अटल लॅबचे  संगणक तज्ञ जे. व्ही. कांबळे व इनचार्ज एस. एन. पाटील यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना हा सुवर्ण क्षण पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. 
     जसजसे घड्याळाचे काटे पुढे सरकत होते तसतसे विद्यार्थांच्या मनात धाकधूक वाढत होती. जसजरा लँडिगचा क्षण जवळ येत होता तसतशी धाकधूक वाढत गेली, श्वास रोखले जात होते, हात जोडले गेले काहीनी चक्क डोळे मिटून प्रार्थना सुरु केली आणि बातमी पाहीली चांद्रयान - ३ मोहीम फत्ते झाली. हा क्षण येताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. जणू काय बोर्डाच्या परिक्षेत माझाच पहिला नंबर आल्याच्या भावना निर्माण झाल्या. जिथ जगातले कोणीच गेले नाही अशा दक्षिण ध्रुवावर भारताने घातलेली गवसणी पाहताना विद्यार्थी भारावून गेले.
        शासनाचा आदेश म्हणून नव्हे तर विद्यार्थ्यांना थेट या सुवर्ण क्षणाचा लाभ घेता यावा. तसेच अनेकाच्या घरी दूरदर्शन नाही, त्यामुळे सर्वांना हा क्षण डोळ्यात टिपता यावा. यासाठी शाळेत अद्यावत तंत्रज्ञान वापरून हे लँडिक पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली - प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment