गडहिंग्लज तालुका पोलिस पाटील संघटनेचे संघटन - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2023

गडहिंग्लज तालुका पोलिस पाटील संघटनेचे संघटन

गडहिंग्लज तालुका पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       गडहिंग्लज तालुका पोलिस पाटील संघटनेचे संघटन करण्यात आले असून तालूका अध्यक्षपदी उदय भरमा पुजारी, उपाध्यक्षपदी किशोर औरनाळकर तर कार्याध्यक्षपदी उदयसिंह शिवाजीराव देसाई यांची निवड करण्यात आली.

    पोलिस पाटलांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी या संघटनेमार्फत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना अध्यक्ष उदय पुजारी यांनी सांगीतले. अन्य सदस्य मंडळ असे - सौ. राजश्री जाधव (सचिव), बबन कुपेकर (खजिनदारी), सदस्य -  महादेव कुंभार, ईश्वर कांबळे, कल्लापा कांबळे, जोतिबा परिट, नारायण गुरव, गंगाराम पाटील, विनायक चिंदके, भाऊसो पाटील, विनया सावंत, गिता नांदवडेकर. यावेळी गडहिंग्लज तालुक्यातीत सर्व पोलिस पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment