![]() |
मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले पाहणी करताना. |
गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
गडहिंग्लज शहरातील चर्च रोडवरील बहुचर्चेत असलेली मुतारी अत्यंत गलिच्छ अवस्थेत होती. त्यामुळे तेथील लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. मुतारीच्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या लोकांना राहणे मुश्किलीचे बनले होते. त्याचबरोबर त्या मुतारीस पुरेसा आडोसा नसल्यामुळे येनाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना, महिलांना ते दृश्य अत्यंत लज्जास्पद असेच होते. तेथील नागरिकांनी मनसेकडे त्या मुतारी विषयी असणारी समस्या व होणारा त्रास या विषयी चर्चा केली होती. या बाबतची तक्रार मनसेच्या वतीने काही दिवसापूर्वी नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली होती. पण सदर निवेदनाची दखल न घेतल्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मनसेच्या वतीने ही बहुचर्चित मुतारी अखेर तेथून हलवून टाकली.
चर्च रोडवर अन्यत्र ठिकाणी नवीन पद्धतीच्या फायबरची मुतारी पालिकेने बसवावी अशी मागणी मनसेने केली आहे. तसेच गटारी स्वच्छ करून घेण्यात आले. चर्च रोड लागत असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर मोठ्या प्रमाणात मधमाशांची पोळी असून हे ठिकाण नागरी वस्तीत असल्यामुळे मधमाशांच्यामुळे या नागरी वस्तीला धोका निर्माण झाल्याचे दिसते. वेळोवेळी सांगूनही प्रशासनाने अद्याप हि पोळी नष्ट केली नाहीत. याविषयी मनसेच्या वतीने प्रशासनाला कळवले आहे. त्यावर अद्यापही त्यावर कारवाई झालेली नाही. एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. ही पोळी चार दिवसात पालिकेने न काडलेस मनसेच्या वतीने त्याचाही बंदोबस्त करू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment