पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासमवेत पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य राजा माने
मुंबई / सी. एल. वृत्तसेवा
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य राजा माने यांनी आज डॉ. डी. वाय. पाटील समुहाचे जनक बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेवून संवाद साधला.
वयाच्या ८९ व्या वर्षांतही डॉ. दादांचा उत्साह कुणालाही अचंबित करणारा आहे. प्रकृतीने ठणठणीत असलेले दादा आजही भेटीला येणाऱ्या स्नेहीजनांचे आस्थेने स्वतः आदरातिथ्य करतात याचा आज पुन्हा प्रत्यय आला. महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल दादांनी राजा माने यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक कुंदन हुलावळे व राजेश जैन हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment