कालकुंद्रीची माहेरवाशीण सौ. वैशाली पाटील हिला 'शिक्षणशास्त्र विषयातील पीएचडी' - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2023

कालकुंद्रीची माहेरवाशीण सौ. वैशाली पाटील हिला 'शिक्षणशास्त्र विषयातील पीएचडी'

सौ. वैशाली महेश पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         गुरु नानक काॅलेज ऑफ एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, भांडुप - मुंबई येथील प्राध्यापिका सौ. वैशाली महेश पाटील यांना नुकतीच पीएचडी प्राप्त झाली. "तंत्रज्ञान, अध्यापन कौशल्ये आणि स्वयं-नियमित अध्ययन निती  विकसित करण्यासाठी मिश्रित शिक्षण अभ्यासक्रमाची  बी. एड. विद्यार्थ्यांवर प्रभाविता: मिश्र पद्धतींचा अभ्यास.” या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला होता.

      डॉ. वैशालीचे मूळ गाव कालकुंद्री (ता. चंदगड) असून तिचे पहिली ते चौथी चे शिक्षण मराठी शाळा कालकुंद्री तर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावातीलच सरस्वती विद्यालयात झाले. ती सरस्वती विद्यालयचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी. एस. पाटील यांची कन्या, कॅलिफोर्निया अमेरिका येथे असलेले इंजिनियर विजय पाटील यांची बहीण तर (निट्टूर, ता. चंदगड) येथील कै. व्ही. डी. पाटील यांची सून आहे. गेल्या दहा वर्षांपासून ती मुंबई येथील गुरुनानक कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तिला या कामी संस्था पदाधिकारी, सहकारी प्राध्यापक यांचे सहकार्य तर घरच्या मंडळींचे प्रोत्साहन लाभले. डॉ. वैशाली पाटील यांच्या या यशाबद्दल चंदगड तालुक्यासह शैक्षणिक क्षेत्रात कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment