बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी बेळगाव या ठिकाणी राखी प्रदर्शनाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2023

बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी बेळगाव या ठिकाणी राखी प्रदर्शनाचे आयोजनतेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
     टीएफ सोसायटी संचलित बालिका आदर्श विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलींनी आज आपल्या स्वहस्ते बनवलेल्या राखींचे प्रदर्शन केले. यावेळी मुलींनी बनवलेल्या निरनिराळ्या सुंदर अशा राख्यांचे प्रदर्शन शाळेतील सौ संगीता देसाई हॉलमध्ये पार पडले. या वेळेला या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. मोडक आणि सौ. मृदुला पाटील यांनी केले. शाळेतील इको क्लब आणि हस्तकला यांच्यामार्फत आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला शाळेतील सर्व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
    तसेच मुलींनी राख्यांची खरेदी सुद्धा केली. या प्रदर्शनाला संचालक मंडळातील माधुरी शानभाग, आनंद गाडगीळ  यांनी भेट देऊन मुलींनी बनवलेल्या राख्यांचे कौतुक केले. यामध्ये सहावी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे दोन गट करून प्रत्येक गटातील तीन क्रमांक काढून त्या विद्यार्थिनींना रोख बक्षीसे शाळेमार्फत देण्यात आली. हे राखी प्रदर्शन भरवण्यासाठी आणि पार पाडण्यासाठी शाळेतील क्राफ्ट शिक्षिका कविता चौगुले, सुजाता देसाई आणि इको क्लब मार्फत अश्विनकुमार पाटील  यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रदर्शनाला शाळेतील सर्व शिक्षकांचे तसेच प्राथमिक मुख्याध्यापक मंजुनाथ गोलीहळी आणि माध्यमिक मुख्याध्यापक एन. ओ. डोंनकरी यांचे प्रोत्साहन लाभले.


No comments:

Post a Comment