माडखोलकर महाविद्यालयात संख्याशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत - चंदगड लाईव्ह न्युज

29 August 2023

माडखोलकर महाविद्यालयात संख्याशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील संख्याशास्त्र विषयाच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे राहुल पाटील (कन्सल्टंट डेटा सायंटिस्ट कॅप जेमिनी) यांनी संख्याशास्त्र विषयातील भविष्यातील संधी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हे क्षेत्र आव्हानात्मक असून विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता वृद्धिगत केल्यास निश्चितच त्यांना त्यांचे जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यतीत करता येण्याची संधी आहे, असे मत व्यक्त केले. 

       अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य पाटील यांनी महाविद्यालयाने संख्याशास्त्र विभाग सुरू केल्यामुळे पश्चिम भागातील विद्यार्थ्यांची फार मोठी सोय झाली आहे तसेच या विषयाची गरज व नवनवीन संधीची शक्यता विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यामुळे उत्तरोत्तर विद्यार्थी संख्या वाढत आहे. या विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य आहे असे मत व्यक्त केले. यावेळी पूजा पाटील व नरेंद्र कडुकर या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. 

        प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. एल. एन. गायकवाड यांनी केले. ते म्हणाले "संख्याशास्त्र हा विषय अलीकडच्या काळात अभियांत्रिकी शिक्षणाचा उत्तम पर्याय बनत चालला असून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आकृष्ट होत आहेत. सूत्रसंचालन प्रा. प्रियांका निटटुरकर यांनी केले तर प्रा. मनाली हांडे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यानी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित रसिकांचे लक्ष वेधून घेतले.

No comments:

Post a Comment