गणेशोत्सव मंडळांना तात्काळ तात्पुरते वीज कनेक्शन देणार....! मागणी करण्याचे आवाहन - विशाल लोधी - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2023

गणेशोत्सव मंडळांना तात्काळ तात्पुरते वीज कनेक्शन देणार....! मागणी करण्याचे आवाहन - विशाल लोधी

 

विशाल शिवकुमार लोधी

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

   चंदगड तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव काळात तात्पुरते वीज कनेक्शन घ्यावे. असे आवाहन विशाल शिवकुमार लोधी, उपकार्यकारी अभियंता, महावितरण चंदगड.यांनी केले होते. त्यास अनुसरून तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांनी वीज कनेक्शन ची मागणी केल्यास त्यांना तात्काळ असे कनेक्शन देण्यात येईल, अशी घोषणा वीज वितरण कंपनीच्या चंदगड तालुक्यातील अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे. 

   सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विद्युत सुरक्षा बाबत विशेष दक्षता बाळगावी, विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे, अधिकृत जोडणी द्वारे विद्युत संच मांडणीची आर्थिंग करून घ्यावी, रिसेड्यूल करंट सर्किट ब्रेकर बसवावे, विद्युतभारानुसार योग्य क्षमतेच्या वायर्स वापराव्या, जोड वायर्स वापरू नये, थ्री पिन चा वापर करावा. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड करू नये. असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे. जोडणीच्या मागणीसाठी चंदगड तालुक्यातील महावितरणच्या चंदगड- १,२ व ३, अडकूर, हलकर्णी-१ व २, तुर्केवाडी- १ व २, कोवाड- १ व २ आदी कार्यालयांत संपर्क साधावा, तसेच आपली विद्युत संच मांडणी मान्यताप्राप्त ठेकेदार कडून तपासून त्याचा टेस्ट रिपोर्ट घ्यावा व क्षेत्रीय शाखा कार्यालयात ना हरकत प्रमाणपत्र साठी अर्ज करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:

Post a Comment