कालकुंद्री येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2023

कालकुंद्री येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात

 

कालकुंद्री येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
       कालकुंद्री (ता. चंदगड) येथे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच छाया जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त जवान मारुती नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. 
    कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरेश नाईक यांनी केले. यानिमित्ताने नाईक समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात माजी सैनिक मारुती नाईक यांचा सपत्नीक सत्कार झाला, याशिवाय श्रीमती शांता नागोजी नाईक, सौ कल्पना युवराज नाईक, शिवाजी कृष्णा नाईक, मारुती निंगाप्पा नाईक, सुरेश सट्टूप्पा नाईक, अंगणवाडी सेविका सौ रेश्मा सुरेश नाईक यांचा समावेश आहे. यावेळी उपसरपंच संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मुतकेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ गीता नाईक, तंटामुक्त समिती उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, ईश्वर वर्पे, कलाप्पा पाटील, उमाजी नाईक महिला मंडळच्या सर्व सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल नाईक, मारुती रामू नाईक आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कोले यांनी केले.

No comments:

Post a Comment