चंदगड तालुक्यातील मराठा समाज आक्रमक, आरक्षणासाठी पाटणे फाटा येथे रास्ता रोको - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2023

चंदगड तालुक्यातील मराठा समाज आक्रमक, आरक्षणासाठी पाटणे फाटा येथे रास्ता रोको

पाटणे फाटा येथे मराठा आरक्षणासाठीच्या रास्को आंदोलनात सहभागी झालेले मराठा.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला सरकारने केवळ आश्वासनावर झुलवत ठेवले आहे. उलट मराठ्यांच्या आंदोलन दपडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने समाज पेटून उठला आहे. याचाच एक भाग म्हणून आज चंदगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे २ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.


 
       यावेळी तालुका अध्यक्ष सुरेश सातवणेकर यांनी मोर्चाचा उद्देश स्पष्ट करत शांततेचे आवाहन केले. तर उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त केला. यापुढे तालुक्यात वेगळ्या पद्धतीने मोर्चे निघतील आणि हे सरकारला महाग पडेल असे सांगत मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

        गोपाळराव पाटील यांनी मराठा समाज्यातील राज्य कर्त्यांनी वेळीच जागे होऊन मराठा सामाज्याचे नेतृत्व करून हक्क मिळवून द्यावा अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल आसे सांगितले. प्रभाकर खांडेकर यांनी मराठ्यांचा अंत पाहू नका असा सज्जड दम दिला. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा उभारु असे संग्राम कुपेकर यांनी सांगितले.

     यावेळी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल काहीही येवो मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाण पत्र मिळावे, आंदोलन कर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावे,लाठीचार्ज करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी,अश्या मागण्या या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केल्या. यावेळी पांडुरंग बेनके, विष्णु गावडे, शंकर मनवाडकर, प्रताप उर्फ पिनु पाटील, गणेश फाटक, गजानन कदम, सुधाकर पाटील, लक्ष्मण यादव यांनी हि सरकारच्या आडमुठ्या धोरणांचा निषेध नोंदवीला.

    यावेळी विलास पाटील, शांताराम पाटील, तानाजी गडकरी, नितीन फाटक, संदीप नांदवडेकर, भारत गावडे, विशाल पाटील, महादेव वांद्रे, जानबा चौगुले, रजत हुलजी, अमित वर्पे, भैरू खांडेकर, उदय सावंत, सुहास गुरव, गोविंद पाटील, संजय पाटील, अशोक कदम, राम पाटील, प्रताप सूर्यवंशी आदिसह  विविध विभागातून मराठा बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment