सातवणे -चाळोबा येथे बसला अपघात, १ जण ठार तर ४ विद्यार्थी गंभीर जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2023

सातवणे -चाळोबा येथे बसला अपघात, १ जण ठार तर ४ विद्यार्थी गंभीर जखमी

 

अपघातग्रस्त बस

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

       दोडामार्ग  - कोल्हापूर एस टी बसने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. तर रस्त्याकडेला शाळेला जाण्यासाठी थांबलेल्या ४ विद्यार्थ्यांनाही बसची धडक बसल्याने दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजता चंदगड – गडहिंग्लज मार्गावर सावर्डे फाट्यानजीक चाळोबा मंदिरासमोर  घडली. या अपघातात बाळू तुकाराम साबळे (वय ५२ रा. सत्तेवाडी ता. चंदगड) हा दौलत साखर कारखान्याचा कामगार मृत झाला तर शुभम संजय गावडे (वय १४) सिद्धेश मारुती ढोकरे (दोघेही रा. सावर्डे) व कुणाल कृष्णा कांबळे  वय १६ (रा. कानडी), वैभव भरत कोंडूसकर (रा. पोवाचीवाडी) हे गंभीर जखमी असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातातील मृत बाळू तुकाराम साबळे

  याबाबत घटनास्थळावरून व‌ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, बाळू हे नेहमीप्रमाणे आपल्या (एमएच ०९ एपी ५४९८) या क्रमांकाच्या दुचाकीवरून दौलत कारखान्याकडे येत होते. सावर्डे फाट्यानजीक आले असता चंदगड- गडहिंग्लज मार्गावरून कोल्हापूरला जाणाऱ्या दोडामार्ग एसटी क्र. MH 14 BT 4231 या बसने दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार  एसटीच्या खाली आल्याने गंभीर जखमी झाला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने  नागनवाडी येथील शाळेला जाण्यासाठी  याच बस थांब्यावर थांबलेल्या चार विद्यार्थ्यांना उडविले. यामध्ये  शुभम संजय गावडे, (वय १६ ) सिद्धेश मारुती ढोकरे (दोघेही रा. सावर्डे) तर कुणाल कृष्णा कांबळे (रा. कानडी), वैभव भरत कोंडूस्कर (रा. पोवाचीवाडी) हे गंभीर जखमी असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे

  गंभीर जखमी बाळू साबळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चंदगडचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ मदत केली. घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. या अपघाताची फिर्याद पांडूरग देवलकर (वय ४४ रा सत्तेवाडी ता चंदगड) यांनी चंदगड पोलिसात दिली असून एस टी बसचा चालक लालासाहेब आनंदराव मस्के (वय ५१) रा. कसबा बावडा रोड कोल्हापूर यांच्या विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. घटनेचा अधिक तपास पोनि संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई नाईक करत आहेत.No comments:

Post a Comment