चंदगड येथील राष्ट्रीय विक्रांत निबंध स्पर्धेत पुण्याचा सर्वार्थ खोत प्रथम, ५५४ स्पर्धकांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2023

चंदगड येथील राष्ट्रीय विक्रांत निबंध स्पर्धेत पुण्याचा सर्वार्थ खोत प्रथम, ५५४ स्पर्धकांचा सहभागचंदगड / प्रतिनिधी 
       चंदगड मधील नामांकीत अभियंता कै. विक्रांत बांदिवडेकर यांच्या स्मरणार्थ करिअर स्पेक्ट्रम व सुपरक्लासमेट ग्रुप चंदगड तर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय विक्रांत निबंध स्पर्धेत इंग्रजी विभागात सर्वार्थ खोत (पुणे) मराठी विभागात प्रज्ञा सुर्यवंशी (कराड) तर हिंदी विभागात गुलनाझ पठाण (नागपूर) व शाळा विभागात लाहोटी कन्या प्रशाला (कराड)यानी प्रथम क्रमांक मिळवला. दि.३० मार्च २०२३ रोजी सुरु झालेल्या या ऑनलाईन निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण  दि न्यू इंग्लिश स्कुल , चंदगड येथे संपन्न झाला . या स्पर्धेमध्ये देशभरातून १०० हून अधिक शाळा व महाविद्यालयातून ५५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
'

इंग्रजी विभागात पहिला क्रमांक कु . सर्वार्थ खोत , दिल्ली पब्लिक स्कुल पुणे ,२)कु अमला गद्दाम,लिटल फ्लावर इंग्लिश स्कुल सोलापूर,३) कु .तन्वी केतकर , बालमोहन विद्यामंदिर दादर ,४)कु.अथर्व पालवे , श्री साई हायस्कुल ,अहमदनगर,५) कु . जोषिका बंगेरा , कार्मेल हायस्कुल मंगलोर .


  मराठी विभागात प्रथम क्रमांक : कु . प्रज्ञा सुर्यवंशी , लाहोटी कन्या प्रशाला कराड,२) कु . अनिषा पुजारी , वि . दि . शिंदे हायस्कुल गडहिंग्लज,३) कु . पुर्वा गुरव , वि . दि . शिंदे हायस्कुल गडहिंग्लज,४) कु.आराधना काळे , अकोले,५) कु . आयुषा पाटील , श्री सरस्वती विद्यालय , कालकुंद्री . हिंदी विभाग पहिला क्रमांक : कु . गुलनाझ पठाण , नागपूर२) कु . प्राप्ती जाधव , लाहोटी कन्या प्रशाला कराड,३) कु . नंदिनी किनकर , नागपूर,४) कु . सफा शेख , जयसिंगपूर,५) कु.मधुबाला गौतम,पुणे .


शाळा गट : पहिला क्रमांक : लाहोटी कन्या प्रशाला कराड ,२) वि . दि . शिंदे हायस्कुल गडहिंग्लज,३) श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री यानी अनुक्रमे नंबर मिळविले.सर्व विभागातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम अनुक्रमे  ५००१, ३००१,२००१,१५०१, १००१  प्रमाणपत्र व चषक देण्यात आला.तर  ६० स्पर्धकांना उत्तेजनार्थ चषक व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली . या कार्यक्रमाला माजी प्राचार्य डॉ एस . पी . बांदिवडेकर,ॲड.आर . पी . बांदिवडेकर , सौ.व्ही .आर . बांदिवडेकर , प्राचार्य एन.डी.देवळे, प्रा.राज साळुंखे , प्रा.एस.एम . पाटील , मुख्याध्यापक सुभाष बेळगांवकर, प्रविण नेसरीकर , नितीन पाटील, एस . व्ही . गुरबे,डी.एम.बेनके , श्रीमती कविता बांदिवडेकर , सुपर क्लासमेट ग्रुपचे  अवधुत जोशी , महेश माने , महेश पिळणकर , रविंद्र पाटील , विवेक गिरी , दत्तात्रय चिक्कोडे , मोहन डोणकर , गणपत मांगले यासह सर्व मित्रपरिवार , खेडूत शिक्षण मंडळाच्या विद्याशाखांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व बांदिवडेकर परिवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय साबळे यांनी केले.


No comments:

Post a Comment