पोवाचीवाडी पोलीस पाटीलपदी वारसाला संधी देण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2023

पोवाचीवाडी पोलीस पाटीलपदी वारसाला संधी देण्याची मागणी

 


तेऊरवाडी / सी.  एल. वृत्तसेवा

       पोवाचीवाडी (ता. चंदगड) येथील पोलीस पाटील संदीप पाटील यांचा कर्तव्य बजावताना खून झाला. त्यांच्या जागी त्यांची पत्नी अनुराधा पाटील यांना पोलीस पाटीलपदी निवड करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील गडहिंग्लज संघाने केली आहे.

   पोवाचीवाडी येथील पोलीस पाटील संदीप पाटील यांचा कर्तव्यावर असताना खून झाला. त्यांच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी, दोन मुले आहेत. पत्नी अनुराधा पाटील यांच्यावर कुटूंबाची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांची सदर पदावर नेमणूक करावी. यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीच्या सदस्यपदी काम केले आहे. यामुळे त्या अनुभवी आहेत. याचा विचार करून त्यांची नेमणूक करावी अशी मागणी या निवेदनातून केले आहे.

      गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना सदर निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उदय पुजारी, अनिल महाडिक, उदयसिंह देसाई, आनंदराव गवळी, नारायण गुरव गंगाराम पाटील, शंकर कांबळे, राजश्री जाधव, रेणुका परीट, तानाजी कुरळे, भागोजी कागिणकर यांच्यासह अन्य पोलीस पाटील यांनी निवेदन दिले आहे. 

                      

No comments:

Post a Comment