म्हाळेवाडी प्राथमिक शाळेत महिला मेळावा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2023

म्हाळेवाडी प्राथमिक शाळेत महिला मेळावा उत्साहात

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा  

       म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत महिला मेळावा किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

        प्रारंभी मुख्याध्यापक न. ल. पाटील यांनी केले. दयानंद पवार यांनी लेक वाचवा लेक शिकवा, अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख एन. व्ही. पाटील यांनी मुलांचा अभ्यास पालक जबाबदारी व शिरोडकर यांनी मुलांचे आरोग्य, मातांचे प्रबोधन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच चाळोबा पाटील, उपसरपंच विजय मर्णहोळकर, ग्रामसेवक, पोलिस पाटील यासह महिलावर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सायनेकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक श्री. पाटील यांनी मानले. 

No comments:

Post a Comment