म्हाळेवाडी शाळेत आजी-आजोबा दिवस संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2023

म्हाळेवाडी शाळेत आजी-आजोबा दिवस संपन्न

 

म्हाळेवाडी शाळेत आजी आजोबा दिवस संपन्न 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. प्रथम उपस्थित सर्व आजी आजोबांचे स्वागत मान्यवरांकडून करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे पाय धुवून हळदी कुंकू लावून, पायावर फुले ठेवून नमस्कार केला. आजी आजोबांचे महत्व दयानंद पवार व मुख्याध्यापक न. ल. पाटील यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला सरपंच चाळोबा पाटील, केंद्रप्रमुख एन. व्ही. पाटील, अध्यक्ष किरण पाटील, उपसरपंच विजय मर्णहोळकर, सर्व शा. व्य. समिती सदस्य व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सायनेकर यांनी केले. 

No comments:

Post a Comment