चंदगड येथील शर्वरी चिंचणगी यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान, कुंभोज येथे शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2023

चंदगड येथील शर्वरी चिंचणगी यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान, कुंभोज येथे शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

 

कुंभोज येथे मुख्याध्यापिका शर्वरी चिंचणगी यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार वितरण करताना शिक्षणमंत्री केसरकर,बाजुला खास.धैर्यशील माने,शिक्षणाधिकारी आंबोरकर 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        चंदगड येथील किलबील इंग्लिश मेडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. शर्वरी संदीप चिंचणगी यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मेडीअम स्कुल असोसिएशन मार्फत देण्यात येणारा २०२३ सालचा (EMSA Inspire Award 2023 हा)आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मस्थळ कुंभोज येथे खास. धैर्यशील माने याच्याअध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोरकर उपस्थित होते.

        विद्यार्थ्यांची सर्वंकष प्रगती व विकासाकरिता त्यांनी आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत.२००६ सली अभिनव एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष संदीप चिंचनगी यांना समर्थ साथ देत किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल चंदगड. राजर्षी शाहू विद्यानिकेतन चंदगड. न्यू सर्वोदय स्कूल कोवाड व अभिनव निवासी संकुल चंदगड. या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा चंदगड मध्ये भक्कम पाया उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाट आहे. इंग्लिश मेडीयम स्कुल असोसिएशन कोल्हापूर जिल्हाअंतर्गत जवळपास ५०० शाळा संलग्न आहेत.या शाळामधील एकूण २५०० शिक्षकामधून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार दिला जातो.शर्वरी चिंचणगी यांच्या निवडीबद्दल त्यांचे परिसरात अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment