गणूचीवाडी -जोगेवाडी येथे जोगेवाडी देवालय परिसराची स्वच्छता करण्यासाठी जमलेले ग्रामस्थ.
तेऊरवाडी / एस. के. पाटील
गणूचीवाडी (ता. चंदगड) जवळच असणाऱ्या जोगेवाडी येथील जोगाई देवीचा झाडाझुडपानी वेढलेला परिसर येथील ग्रामस्थ व युवकांनी श्रमदान करून स्वच्छ केला. अनेक वर्षापासून स्वच्छतेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या जोगाई देवीने मोकळा श्वास घेतला असला तरी या परिसराच्या उत्खननासह संशोधन होणे गरजेचे आहे.
जोगाई देवीची माती मध्ये असलेली पुरातन मूर्ती |
गावापासून जवळच जवळपास १३ गुंठे क्षेत्रामध्ये जोगाईचा परिसर आहे. या ठिकाणी भव्य अशा वटवृक्षासह विविध प्रकारचे जंगली वृक्ष आहे. वटवृक्षाखाली जोगाई ची दगडी पुरातण मूर्ती आहे. मूर्ती मातीमध्ये उभी आहे. जवळच काही पुरातण पाशाण आहेत. तर आज स्वच्छता करताना आणखी एक पुरातण पाषाण आढळला. या सर्वांचे संशोधन होणे गरजेचे आहे. आज गावातील युवक विशेषतः पुणे, मुंबई, बंगलोर आदी भागामध्ये नोकरीच्या निमित्ताने गेलेले युवक गणपती उत्सवासाठी गावी आले आहेत. या सर्वांच्या विचाराने जोगाई देवीचा परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातीन जेष्ठ ग्रामस्थ विविध तरुण मंडळे या सर्वांच्या मदतीने जवळपास ५० ते ६० जणांनी आज हा परिसर स्वच्छ केला. पूर्वी या परिसरात माणवी वस्ती होती . प्लेगच्या साथी नंतर येथील संपूर्ण वस्ती इतरत्र गेल्या चे ग्रामस्थ सांगतात. पण सध्या तरी गणूचीवाडी ग्रामस्थांनी दुर्लक्षित असलेल्या या पुरातण दैवताकडे लक्ष दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment