गडहिंग्लज विभागात गौराईला सजवून घरी आणताना सुवासिनी व युवती |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
गणपतीच्या आगमनानंतर संपूर्ण महिला वर्गाला आतूर ता लागून राहिलेल्या गौराईचे आगमन गडहिंग्लज विभागात मोठ्या उत्साहात झाले. विशेषत: महिला वर्गाने स्वतःसह गौराईला सजवून पारंपारिक गीते गात व झिम्मा फुगड्यांचे खेळ खेळत सोनपावलानी आलेल्या गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
गडहिंग्लज उपविभागातील आजरा व चंदगड तालुक्यात मोठ्या उत्साहात गौराईचे स्वागत करण्यात आले. चंदगड तालूक्याच्या कोकण पट्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. अडकूर पासून पुढे असणाऱ्या सातवणे गाव तर गणपतींच्या देखाव्या साठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. गणेश पूजनानंतर आज तीनही तालुक्यात गौराई चे उत्साहात आगमन झाले. मूली, माहेरासिनी ते वृद्ध महिलांनी सुद्धा गौराईचे स्वागत केले. चंदगड तालूक्यातील प्रत्येक गावात असणाऱ्या पाणवठे, विहीर, तलाव अथवा नदिवर जाऊन गौराईला वाजत -गाजत झिम्मा फुगडी खेळत व पारंपारिक गिते गात घरी आणण्यात आली. यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून आले.
No comments:
Post a Comment