चंदगड तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा हलकर्णी येथे उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2023

चंदगड तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा हलकर्णी येथे उत्साहात संपन्न

व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करताना अविनाश पाटील. आर. आय. पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       विवेक इंग्लिश मेडियम स्कूल हलकर्णी (ता चंदगड )येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटामध्ये  संत तुकाराम हायस्कूल सुंडी यानी प्रथम क्रमांक तर स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडी यानी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. मुलींमध्ये राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी यांचा प्रथम क्रमांक तर द्वितिय क्रमांक स्वामी विवेकानंद हायस्कूल गुडेवाडी यानी मिळवला. तसेच 17 वर्षे वयोगटामध्ये संत तुकाराम हायस्कूल सुंडी प्रथम क्रमांक व आसगाव हायस्कूल आसगाव यानी द्वितीय क्रमांक, मुलींमध्ये श्री ताम्रपर्णी विद्यालय शिवणगे प्रथम क्रमांक,  सेंट स्टीफन्स हायस्कूल चंदगड द्वितीय क्रमांक, 19 वर्षे वयोगटांमध्ये मुलांमध्ये श्री महात्मा फुले विद्यालय व जुनिअर कॉलेज कार्वे प्रथम क्रमांक, श्री सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कालकुंद्री - द्वितीय क्रमांक मिळवला तसेच मुलींमध्ये दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज चंदगड प्रथम क्रमांक, गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील ज्युनिअर कॉलेज हलकर्णी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी उदघाटक व  अध्यक्ष म्हणून  अविनाश पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून  आर आय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाला चंदगड तालुका क्रीडा विभाग अध्यक्ष प्रा. विनोद पाटील  तसेच विवेक इंग्लिश मीडियम चे प्राचार्य  अजय पाटील,  चंदगड तालुका क्रीडा विभाग उपाध्यक्ष व हॉलीबॉल प्रमुख आय. आय. गावडे, एस. बी. पाटील, मोहनगेकर वसंत,  एन. डी.  हदगल , शिवाजी पाटील ' गणाचारी बी एम , कांबळे एन एम यांच्यासह तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक , विद्यार्थी व खेळाडू उपस्थित होते . प्रास्ताविक व्हालीबॉल क्रीडा विभाग उपाध्यक्ष आय वाय गावडे यांनी केले.  सूत्रसंचालन  बी व्ही केसरकर  यांनी केले.No comments:

Post a Comment