चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड पोलिस ठाण्याकडून देण्यात येणाऱ्या सन २०२२ सालातील गणराया अवार्ड वितरण कार्यक्रम शनिवार दि. २२ रोजी पाटणे फाटा येथे व्ही. के. चव्हाण-पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात पोलिस निरीक्षक संतोष घोळवे स्वागत करणार असून तहसीलदार राजेश चव्हाण, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या हस्ते गणराया अवार्ड वितरण करण्यात येणार आहेत. यावेळी महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्रा. पी. डी. पाटील हे गणेशोत्सव मंडळ : गावागावातील समाज कार्याचे केंद्रबिंदू या विषयावर मार्गदर्शन करणार असून तालुक्यातील सर्व तरुण मंडळांनी उपस्थित रहावे असे आवाहन पोलिस निरीक्षक श्री. घोळवे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment