नोकरीचे अमिष दाखवून मामा भाच्याची १५ लाख ७५ हजारांची फसवणूक, कोनेवाडीच्या एकावर गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2023

नोकरीचे अमिष दाखवून मामा भाच्याची १५ लाख ७५ हजारांची फसवणूक, कोनेवाडीच्या एकावर गुन्हा दाखलतेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटलमध्ये शिपाई व क्लार्कची नोकरी देतो असे सांगून अनुक्रमे दत्तात्रय नारायण पाटील - मामा (वय ४२ वर्षे, रा. राजगोळी खुर्द ता चंदगड) यांची व महेश मारुती जाधव (भाचा) यांची १५ लाख ७५ हजारांची कोनेवाडी (ता चंदगड) येथील वैजनाथ विठ्ठल केसरकर यांनी फसवणूक केल्याची फिर्याद दत्तात्रय पाटील यांनी चंदगड पोलिसांत दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. यांसदर्भात संशयित विठ्ठल केसरकर यांच्या विरोधात भा.द वि कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी की, फिर्यादी दत्तात्रय हे एका कानाने ऐकू येत नसल्याने ते कर्णबधिर आहेत. त्यांना नोकरीची गरज होती. यातून वैजनाथ केसरकर यांची सी. पी. आर हॉस्पीटल कोल्हापूर येथ ओळख झाली. यामध्ये संशयिताने आरोग्य खात्यात फिर्यादीस शिपाई म्हणून व साक्षीदार महेश जाधव  यांना क्लार्क म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यातील संशयित वैजनाथ यांने आरोग्य खात्यात शिपाई तसेच क्लार्कची नोकरी मिळवून देतो असे सांगून फिर्यादी यांनी वरील संशयित यांचे नमुद खात्यावरून दि १ मार्च २०२१ ते २० सप्टेंबर २०११ पर्यंत आरटीजीएस दवारे 03,50,000/- तसेच साक्षीदार महेश जाधव यांनी रोख रक्कम 04,50,000/- व आरटीजीएस दवारे 07,75,000/- असे एकूण 15,75,000/- इतकी रक्कम संशयिताने आपले खात्यावर स्विकारले. 

      यातील फिर्यादी तसेच साक्षीदार यांना नोकरीचे आमिष दाखवले, पण नोकरी दिली नाही. त्यामुळे दत्तात्रय पाटील यांनी चंदगड पोलिसात तक्रार केली. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून ४२० कलमा प्रमाणे आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदशनाखाली  पो. सई. श्री. बारामती हे करीत आहेत.

   अन्य कोणाची फसवणुक झाल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

      यातील संशयित आरोपी वैजनाथ विठ्ठल केसरकर याने इतरही अनेक लोकांची नोकरी लावतो म्हणून फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे असे काही व्यक्ती असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन पो. नि. संतोष घोळवे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment