तेऊरवाडी येथील तालमित मातांमध्ये विविध द्रावणे मिसळताना नवोदित मल्ल व ग्रामस्थ
तेऊरवाडी / एस. के. पाटील
चंदगड तालूक्यातील तेऊरवाडी ची ओळख सैनिकांचे, नोकरदारांचे व कुस्तीगीर मल्लांचे गाव म्हणून आहे. याच गावातील तालमिमध्ये नवोदित मल्लांना सरावासाठी चांगल्या प्रतिची माती तयार व्हावी यासाठी तब्बल ८० लिटर तिळेल, ५० किलो दही' १० किलो हळद अन ५०० लिंबूंचा रस या मातीमध्ये मिसळण्यात आला.
तेऊरवाडीत गेल्या १०० वर्षापूर्वी पासून तालिम आहे. या तालमी मध्ये आजपर्यंत हजारो मल्ल घडले. यातील अनेक मल्ल भारतिय सैन्यदलात, पोलिस दलात व शिक्षक पण झाले. गेल्या अनेक दशकामध्ये हजारो मल्ल घडवणारी ही तालिम हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस चालू होती. याच तालमित सराव करताना अनेक मल्लांचे शड्डू घुमत होते.
याच तालमित तातोबा पाटील, तुकाराम पाटील, विठोबा संत, कृष्णा राजगोळकर, निंगाप्पा (नोनपगावडे), बाळू हेंडोळे, विठोबा (राणबाचा) गोपाळ (हुलजी गावडे) विष्णू (हूलजी गावडे) आपाजी सांबरेकर, महादेव पाटील (शिवानगावडे), प्रकाश दळवी, राजाराम पाटील, लक्ष्मण (हुलजी गावडे) मुकुंदा गुडाजी, महादेव पाटील (आर्मी) लक्ष्मण भिंगुडे (आर्मी) आदि हजारो पैलवानानी कोवाड, मलतवाडी निटूर, कुदनूर, कालकुंद्री या कर्यात भागाबरोबरच दाटे, तुडये, तुर्केवाडीसह बेळगाव जिल्ह्यात आयोजित हजारो कुस्ती आखाडे गाजवले.
या सर्वांचा सराव आमरोळी येथून आणलेल्या माती मध्येच चालू असायचा. सध्या ही तालिम ग्राम पंचायतीच्या तळ मजल्यात चालू आहे. या तालमितील मातीला सकसपणा यावा यासाठी श्री राम तालिम मंडळाचे अध्यक्ष व सैन्य दलात पैलवान म्हणून गाजलेले पै लक्ष्मण भिंगुडे यांनी ग्रामस्थांना तालमिच्या माती सुधारणेसाठी आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी ५० लिटर दूध दिले.
देवस्थान कमिटीने ८० लिटर तिळेल तेल दिले. तालीम मंडळाने १० किलो हळद व ५०० लिंबूंचा रस दिला. हे सर्व मिश्रण या तालमितील मातीत मिसळण्यात आले . यावेळी प्रकाश पाटील, रविंद्र पाटील, हेमंत पाटील, राजाराम पाटील आदिनी सहकार्य केले. हि माती कुस्ती साठी मऊ मुलायम झाल्याने नवोदित पैलवानांना या मातिमध्ये कुस्तीचे डाव शिकताना सोपे जाणार आहे. यासाठी पै लक्ष्मण या नवोदित पैलवानांना नित्य नियमाने प्रशिक्षण देत आहेत. आता खरी गरज आहे ती अशा नवोदित कुस्तीगिरांना प्रोत्साहन व मदतीचा हात देण्याची !
No comments:
Post a Comment